अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश अंतर्गत ठाणे जिल्हा विभाग आयोजित दुसरे पी सावळाराम साहित्य संमेलन डोंबिवली नगरीमध्ये दिमाख्यात साजरे. या संमेलनासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून सारस्वतांनी आपला सहभाग नोंदवला. संमेलनाचे उद्घाटक राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक,चित्रपट निर्माते आदरणीय श्री.शरद मधुकर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले सुप्रसिद्ध साहित्यिका मुंबई प्रदेशाध्यक्ष हिरकणी राजश्री बोहरा यांनी संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पद भूषविले. सौ. अनिता गुजर यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित . संमेलनाचे विशेष मान्यवर अतिथी टी.डी.सी बँकेचे चेअरमन ,नगरसेवक श्री. बाबाजी बाळाराम पाटील उपस्थित होते. या संमेलनात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध कवयित्री लेखिका निवेदिका नरेंद्र गुजर यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष हिरकणी राजश्री बोहरा यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ अनिता नरेंद्र गुजर या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश ठाणे जिल्हा अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
आजवर अनेक ऑनलाईन,ऑफलाईन संमेलने राबवली.
फेसबुक तसेच व्हाट्सअप समुहातुन चारोळी… शब्द ओळ चारोळी… कविता..चित्र चारोळी,अभंग, ओवी, भावगीत, लावणी अशा विविध प्रकारातून काव्य लेखन करून सन्मानपत्र मिळाली.
अनंत विचारपुष्प ,मंथन सारामृत हे दैनिक सदर प्रसिद्ध आहेत .
अनेक ठिकाणी काव्य,लेख, कथा,
बालगीत,लावणी, विडंबन काव्य, अशा विविध काव्यप्रकारांचे परीक्षण केले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद डोंबिवली विभागातून महिला दिन विशेष कार्यक्रमात मी स्वयंसिद्धा ह्या स्पर्ध्येस प्रचंड प्रतिसाद.
कोरोना काळात अखिल भारतीय मराठी सहत्य परिषद डोंबिवली विभागातून ऑनलाईन बालझुंबड ही लहान मुलांची स्पर्धा ७०० मुलांच्या सहभागाने यशस्वी पार पाडली.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे विभागातून डॉ.बाबसाहेब आंबेडकर काव्यसंमेलनाचे आयोजन केले. सदर संमेलनात परिषदेच्या दिगग्ज व्यक्ती, आदरणीय रामदास आठवले साहेब व आदरणीय संजय राऊत साहेब यांची मोलाची उपस्थिती.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा विभाग आयोजित नवरात्र विशेष जागर अंबाबईचा या काव्यसंमेलन आयोजित केले.या संमेलनात सुप्रसिद्ध लेखिका सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड तसेच आदरणीय छगन भुजबळ यांच्या सूनबाई डॉ.शेफाली भुजबळ यांची मोलाची उपस्थिती.
माणसे जोडणे आणि ही जोडलेली नाती जोपासणे हा त्यांचा सर्वात आवडीचा छंद आहे.