मालवण
मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित, वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा यांच्यावतीने “भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायत स्पर्धा 2022 आयोजित करण्यात आली आहे. बुधवार 10 ऑगस्ट 2022 रोजी ही स्पर्धा चार गटात होणार आहे.
पहिली ते पाचवी पहिला गट, इयत्ता सहावी ते आठवी दुसरा गट, इयत्ता नववी ते बारावी तिसरा गट व महाविद्यालयीन व खुला असा चौथा गट राहणार आहे. एका गटात सहा ते दहा स्पर्धक (संगीत साथ वगळून ) राहणार आहेत. संगीत साथ आवश्यकता असल्यास आयोजकांमार्फत हार्मोनियम ,तबला इत्यादी साहित्य दिले जाईल. गाण्याची वेळ सहा ते आठ मिनिटे राहील. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या स्पर्धेच्या नाव नोंदणीची अंतिम तारीख दिनांक 7ऑगस्ट 2022 राहील.
स्पर्धेच्या परीक्षणासाठी गाण्याची निवड 10 गुण, सूर ताल 10 गुण, आरोह अरोह 10 गुण, संगीत साथ 10 गुण, एकूण परिणाम 10 गुण असा तक्ता राहणार आहे. प्रत्येक गटातून विजेता व उपविजेता संघ निवडला जाईल. गट क्रमांक 1विजेता 750 रुपये, उप विजेता 550 रुपये, गट क्रमांक 2 विजेता संघ 750 रुपये व उपविजेता 550 रुपये, गट क्रमांक 3 विजेता 1000 रुपये व उपविजेता संघ 750 रुपये, गट क्रमांक 4 विजेता संघ 1000 रुपये व उपविजेता संघ 750 रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. नाव नोंदणीसाठी संपर्क एस सी पेंडूरकर 9422392790, एस ए चांदरकर 9421190383, एम एन कवीटकर 9404915130 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापक संजय नाईक यांनी केले आहे.