You are currently viewing कळसुलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगळी- वेगळी पैठणी स्पर्धा संपन्न

कळसुलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आगळी- वेगळी पैठणी स्पर्धा संपन्न

कणकवली :

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या संकल्पनेतून कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील महिलांसाठी भात लावणी अशी आगळी – वेगळी पैठणी स्पर्धा घेण्यात आली होती. या “भात लावणी पैठणी” स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी घेतला होता.या पैठणी स्पर्धेचा शुभारंभ ग्रा.प.सदस्य प्रगती भोगले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.या आगळ्या – वेगळ्या भात लावणी पैठणी स्पर्धेची चर्चा मात्र कळसुली पंचक्रोशीत सह जिल्हाभर पसरली असून प्रफुल्ल सुद्रीक याचं कौतुक केलं जातं आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रगती भोगले, राष्ट्रवादी जिल्हा युवक उपाध्यक्ष ॲड. भरत घाडीगावकर, राष्ट्रवादी जिल्हा युवक सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, सत्यविजय परब, ॲड.गौतमी गावकर, महिला संघाचे अध्यक्षा अनुजा दळवी, रजनिकांत सावंत, समाजीक कार्यकर्ते प्रकाश दळवी, सुरेखा कदम,विठोबा गोसावी, इशेद फर्नांडिस, स्वप्नाली राऊत, अक्षता देवळी, शोभा घाडीगांवकर, अमृता पाडावे, कोमल राऊत, सुचिता भोगले, रेश्मा तेली, मनाली भोगले, नीलम भोगले, मोहिनी घाडीगावकर, प्रमिला दाभोलकर, शकुतला घाडीगावकर, सारिका नाईक,आदी महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲड.गौतमी गावकर म्हणाले पैठणी स्पर्धा गावागावात खूप घेतल्या जातात,अशी अनोखी स्पर्धा असल्यानं कळसुली गावात भात लावणी पैठणी स्पर्धेत मोठ्या संख्येने महीला भाग घेतला. जुण्या परंपरा जोपासण्यासाठी युवा पिढीला मदत होईल,अशा स्पर्धा घेवून समाजामध्ये शेती विषयी जनजागृती व्हावी,तसेच या शेतीतील पारपारिक पद्धतीअशाच पुढे टिकून रहाव्यात हाच या लावणी स्पर्धेचा उद्दिष्ट आहे.

या भात लावणी पैठणी स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्नाली राऊत यांनी पटकावला. तर द्वितीय क्रमांक अक्षता देवळी, तसेच तृतीय क्रमांक शोभा घाडीगांवकर यांनी मिळवला.

प्रतिक्रिया व्यक्त करा