जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना
भारताचे असती नागराजे ख्यात प्राचीन
पराक्रमी नागवंशीय राजे कर्तृत्ववान।।ध्रु।।
सर्वात मोठा होता नागराज अनंत
जम्मू काश्मीरांतील अनंत नाग प्रसिद्ध
राजाच्या कर्तुत्वाची साक्ष देते पटवून।।1।।
नागराजा वासुकी उत्तर प्रदेश नृप
नागराजा तक्षक होता जगप्रसिद्ध
तक्षशिला विश्वविद्यापीठ केले स्थापन।।2।।
नागराजा कर्कोटक रावी प्रदेश नृप
भंडारा प्रांत प्रमुख नागराजा ऐरावत
पाचही राज्यांच्या सीमा एकमेका लगत।।3।।
होते पाच नागराजांच्या स्मृती प्रित्यर्थ
प्रतिवर्षी साजरी होत नागपंचमी तिथ
प्रजा नागराजांचे सदैव करिते स्मरण।।4।।
कृषीवलांचा मित्र आहे कृषी रक्षक नाग
शिवाच्या गळ्यांत नागाला मानाचे स्थान
भगवान विष्णू करिती शेषावर शयन।।5।।
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.
Cell.9373811677.