कधीतरी…
स्वतःसाठी…
किती मरायचं दुसऱ्यांसाठी,
आपल्यासाठीही थोडं जगून बघावं.
चांगलं तर रोजच वागतो,
कधीतरी थोडं वाईट वागून पहावं.
आपल्यासाठीच जगल्यावर,
आपली तेवढीच येतात जवळ.
स्वार्थासाठी येणारी तेव्हा मात्र,
दुरूनच पाहतात तुमची तळमळ.
थोडं कधी वाईट वागलात तरी,
आपली तुम्हाला समजून घेतील.
परकी मात्र तुमच्यात तेव्हा,
शंभर चुका सहज काढतील.
चांगल्या वाईटाची व्याख्या,
आपण कधीच ठरवत नसतो.
अवगुण सद्गुणांचा कित्ता,
मनातही कधी गिरवत नसतो.
आपल्यातला बदल दुसऱ्यांना,
आपणापेक्षाही पटकन समजतो.
डोळे हसत असले तरीही…
चेहरा मनाचा आरसा बनतो…
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६