You are currently viewing तुमच्याधूनच पुढे लेखक, कवी, साहित्यिक निर्माण होतील : साहित्यिक उषा परब

तुमच्याधूनच पुढे लेखक, कवी, साहित्यिक निर्माण होतील : साहित्यिक उषा परब

मळगाव येथील कै उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरात पावसाळी स्वरचित काव्य मैफिल संपन्न

सावंतवाडी

कविता वाचन करताना घाई करू नका, श्रोत्यांच्या नजरेस नजर भिडवून तुम्ही कविता सादर केली तर ती त्यांना सहज समजते, तुमच्यासारख्या मुलांमधूनच पुढे लेखक, कवी, साहित्यिक निर्माण होतील आणि त्याचा श्री गणेशा आज येथून ,करा, असे प्रतिपादन प्रमुख अतिथी कवयित्री उषा परब यांनी केले. कार्यक्रमात मुलींनी व शिक्षकांनी पावसावर आधारित कविता सादर केल्या. त्याला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

मळगाव येथील कै उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिराच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात श्रावणधारा अंतर्गत पावसाळी स्वरचित काव्य मैफिल कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर,उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, संचालिका स्नेहा खानोलकर, ग्रंथपाल आनंद देवळी, कवयित्री कल्पना बांदेकर, कोलझर येथील कवी रामचंद्र शिरोडकर, कर्मचारी पूर्वा नार्वेकर किशोर वालावलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचे व उपस्थित बालकवीतर्फे एकाचे स्वागत हेमंत खानोलकर यांनी केले. परब पुढे म्हणाल्या, तुम्हाला एखादी गोष्ट खटकली किंवा एखादी गोष्ट आवडली ती तुम्ही कवितेतून किंवा लेखनातून मांडू शकता. कविता सादर करताना घाई न करता असे सांगितले. तसेही खानोलकर वाचनालय वेगवेगळे उपक्रम राबविणारे सक्रीय वाचनालय आहे, या वाचनालयात वेगवेगळे साहित्यिक उपक्रम राबविले जातात, हे खरच कौतुकास्पद आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी इंदिरा संत यांची अक्कू बक्कूची दिवाळी, सुचते मला कविता पावसाची ही स्वरचित कविता तसेच आपल्या इतर स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी त्यांनी आपण लिहिलेल्या काही पुस्तक वाचनाल्याला भेट दिली.
त्यानंतर भाग्यश्री बाईत हिने पाऊस, तनिष्का जाधव हिने पंढरीची वारी, सानिका गोसावी हिने पावसाळा, शांती गावडे हिने माझो वेत्ये गाव, प्रियांका पाटील हिने आई,मालवणकर मॅडम यांनी पावसाची किमया, सानिका शिरोडकर हिने पाऊस, ऋतुजा पार्सेकर हिने अरे अरे पावसा, गौरी डिचोलकर यांनी पहिला पाऊस, यशस्वी पेंडुरकर हिने अरे अरे पावसा येशील का?, रामचंद्र शिरोडकर यांनी मिरगवणी व मला ते प्रेम देशील का?, कल्पना बांदेकर यांनी पावंसारखच मन माझ व मायमाऊली, वेदिका मठकर हिने पाऊस, किशोर वालावलकर यांनी वाडीचो पावस, दिव्यानी निरावडेकर हिने पाऊसधारा, सावंत भोसले मॅडम यांनी पाऊस इथेही कोसळतो, राखी कासरलकर हिने पहिला पाऊस, मानस पाटकर याने पाऊस आला, पूर्वा गावकर हिने पाऊस आदी स्वरचित कविता सादर केल्या. तर स्नेहा खानोलकर यांनी कुसुमाग्रज यांची कणा ही कविता सादर केली. या सर्व कवितांना उपस्थित मान्यवरांचा व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ नार्वेकर यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहा खानोलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी वाचनालयाच्या कर्मचारी पूर्वा नार्वेकर यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा