पखवाज अलंकार प्रशिक्षक महेश सावंत यांचे कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
कुडाळ
पखवाज महागुरु डॉ. दादा परब आणि भजन सम्राट श्री भालचंद्र केळुसकर बुवा संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, सिंधुदुर्ग पखवाज अलंकार प्रशिक्षक महेश विठ्ठल सावंत आणि सर्व विद्यार्थी वर्ग प्रस्तुत भजन साथसंगत कार्यशाळेचे आयोजन 06 व 07 ऑगस्ट रोजी सकाळी 08 ते सायंकाळी 07 पर्यंत करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांचे निवासस्थानी आंदूर्ले सावरीचे भरड, ता. कुडाळ येथे होणार आहे
शनिवारी 06 ऑगस्ट रोजी पहिले सत्र सकाळी 08 ते 01 असणार असून विद्यार्थ्यांना भजनातील ताल व ठेके यांचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक महेश सावंत (पखवाज अलंकार), दत्तप्रसाद खडपकर (पखवाज विशारद) सचिन कातवणकर (पखवाज विशारद) यांस कडून दिले जाणार आहे. तसेच दुसऱ्या सत्रात दुपारी 02 ते 07 या वेळात तज्ञ मार्गदर्शक भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा, संगीत अलंकार अजित गोसावी बुवा, पखवाज महागुरु डॉ. श्री दादा परब यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
रविवारी 7 ऑगस्ट रोजी सकाळी 08 ते सायंकाळी 07 वाजेपर्यंत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 08 ते 03 या वेळेत विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे पखवाज/ तबला/ ढोलकी वादन असणार आहे. त्यानंतर दुपारी 03 ते 3.30 पर्यंत गुरुपूजन सोहळा तसेच 04 वाजता गुरुवर्य संगीताचार्य डॉ. श्री सचिन कचोटे (कोल्हापूर) यांचे एकल तबला वादन होणार आहे. तसेच सायंकाळी 05 वाजता टीव्ही स्टार ढोलकी वादक भार्गव कांबळे (कोल्हापूर) यांचे बहारदार ढोलकी वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती ॲड. दिलीप ठाकूर यांची असणार आहे.
तरी सर्व संगीत प्रेमी, सर्व रसिक श्रोते यांनी उपस्थित रहावे अशी विनंती महेश विठ्ठल सावंत तसेच सर्व विद्यार्थी वर्ग यांनी केली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजा सामंत, नेरुर, दाजी जुवाटकर- खवणे हे करणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क खालील नंबर वर संपर्क साधावा
मोबा. 8805891575 / 9420307336