💫लालित्य नक्षत्रवेल समूह संस्थापक लेखक कवी श्रीकांत दीक्षित लिखित अप्रतिम ललित लेख🦚
उन्हे उतरताच खाली..
आता कलले तिरपी किरणे
हळवी सांज कशी अवतरली..
मग थांबले सारे धावणे…
शांत झाली पदकमले
विसावली या शुभ संध्येला….🌈🌈
एक रमणीय मनभावन संध्या!!.. 🌈 दिवस व रात्र या दोहोमधील एक सीमारेषाच जणू. दिवसभर उन सावलीचा खेळ खेळून थकलेला रवी जणू निशाराणीला भेटण्यास आतूर झालेला सखा.
रवीअस्त होता होता सांजवेळ होई,
आहिस्ता आहिस्ता प्रकाश मंद होई.
मैफिल सुरांची मन तल्लीन होई….⚡⚡💝💫
संध्यासमयी असलेले तेजपूंज रूप.. आता लाल तांबूस शीतल रूप घेऊन रवी आता मावळतीच्या दिशेने आता प्रयाण करतोय. क्षितीजावर पसरलेली लाली जणू सारी धरती लाजून चूर झालीय!!.. रक्तीमा जणू आपल्या गालावरी पसरली आहे अस या नवतरूणीला वाटते.पण जाताना हि संध्या किरणे किती सुंदर दिसतात. तो शांत स्थिरावत चाललेली शितल छाया. ही दररोज येणारी सांजवेळ पाहण्यास मन आतूर होते. दररोज एक अनोखा अनूभव घेऊन आवरते. कधी ती संध्यामधुरा तर कधी काजळमाया तर कधी गुलाबी थंडीत उबदारपणा दाखवणारी, मन उल्हासीत करते.💕💕
पण काही म्हणा..संध्याकाळ झाली की मनी का हूरहूर दाटते??.. काय असतं खास की मनात काहूर माजते?.. खरं तर याचे उत्तर शोधायला गेले तर मन निशब्द होते..सारा मनाचाच खेळ जणू!!..सांजवेळी आठवांचे कवडसे डोकावतात…छतातूनी ते कवडसे अंधूकसे झेपावतात…!!.🌾🌾
याच वेळी कपिला आपल्या वासराच्या ओढीने गोठ्याच्या दिशेने धावत जाते. पक्ष्यांचा शाळा किलबिल करत सुटते.
“सांजवेळी आली पाखरे नभी
लगबग त्यांची झाली सुरू”
आकाशात आपला हक्क सांगण्यास हळूच चंद्र डोकावण्याच्या तयारीत आहे. तर सारे तारे आपले बळ एकवटून आकाशातील सौंदर्यात भर घालण्यास आतूर आहेत.
घराघरात शुभंकरोतीचा सुमधूर आवाज करत, घंटानाद होतो. सारे वातावरण भक्तीमय होते तर देव्हार्यात सांजवात पाजळायला सुरवात होते.
“शुभंकरोती कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा….”
सांजवातेची ही सारी रूप पहायला निशाराणी येते अन तिच्या चाहूलीनेच ही षोडषवर्णीय भासणारी संध्याकाळ बावरते… कोमेजून जाते.. निशाराणीच्या आगमनाने तिचे अस्तीत्वच मिटते.. दररोज एक अनामिक हुरहुर लाऊन सांजवेळ निघून जाते…..
आयुष्यातील जेव्हा सांजवेळ आवरते तेव्हा संपूर्ण आयुष्याचा चित्रपट झटकन डोळ्यासमोर येतो. अन् मग एक अनामिक हूरहूर लागते. ही सांजवेळ कधी संपूच नये अस वाटते. अनाठायी अंधाराची भिती वाटायला लागते. मन मग वाट पहायला लागते पुन्हा सांजवातेची.
🌻🌿🌿🍀🍀🌻🌻🎀🌻🌻🍀🍀
*_श्रीकांत दीक्षित_*
*पुणे©*