*●●◆जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गजलाकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम कथा कविता◆●●*
■◆■● *पोवाडू* ●■◆■
पोपट वाघ आणिक डुक्कर
मैत्र तयांचे भलते मनोहर…
जंगल जंगल करीत मंगल
सुखात होते नव्हती दंगल..
जगणे त्यांचे एवढे चोखट
बिमार पडला एक दिन पोपट
त्यातच त्याचा अंत जाहला
पाहवत नव्हते हे वाघाला
दुःख एवढे मोठे झाले
पोपटामागे दोघेही गेले
गट्टी त्यांची खरी खरोखर
प्राण सोडती वाघ नि डुक्कर
तिन्ही साथी जेथे गेले
झाड अनोखे तिथे उगवले
सुगंध त्याचा भलता दरवळ
मोहून गेली माणसावळ…
मादक दर्प मोहक फुले
झाडाखाली तनमन डोले
शक्कलेतून काढला तर्क
त्याच फुलांचा काढला अर्क
सुख दुःखाला लागले सारू
माणसाने शोधली ती दारू
गुण उतरले तीन मित्रांचे
पोपट वाघ अन डुकराचे…
घेता थोडी, ती पोपटपंची
बात बोलतो माणूस मनची
रिचवता अधिकची कधी गळी
फोडत राहतो नुसती डरकाळी
डुक्कर आतले तऱ्हाच न्यारी
पाय अडखळे लोळे गटारी
सुरस कहाणी सुरू निरंतर
प्रकटले पोपट वाघ नि डुक्कर..
कहाणी जुनी अशी सांगतो
कवितेत मी नव्याने मांडतो…
आवडो रसिका कविता न्यारी,
येऊ घातली आवस गटारी!
*जयराम धोंगडे, नांदेड*
गटारी नव्हे …
*दीप अमावस्या*
“नशा, करी जीवनाची दशा!”