*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*टरफलं ! झालीत आमची!*
टरफलं झालीत आमची
गरजेपूर्तीच आम्हांला किंमत होती
आता घालमेल फक्त चोथा होण्याची
घाई कचराकुंडीत फेकून द्यायची होती
सुखासुखी आकांत टरफलांना
मांडता आला असता
स्वतःच मोल ओळखण्या इतका
आशयाचा दाणा गिळता आला असता
फेकून टाकल्या टरफलांना
तसं स्वामित्व कुणाचं नसतं
आम्ही ती फेकली नाहीत सांगत
सा-यांना टिळक व्हायचं असतं!!
पायांत रूतण्याची टरफलांत
कुवत कधीच नसते
चेंगरून दबक्या आवाजात
मातीत निपचित पडून राहावे लागते!!
कोण छोटा!कोण मोठा !
त्याचं मातीला काहीही घेणंदेणं नसते
निगृण,निर्मोही,निराकारी
टरफलांना माती ओळखत असते!!
बाबा ठाकूर