प्रभाग ९ अनुसूचित जातीसाठी; एक, दोन, चार व दहा नामाप्र महिलांसाठी राखीव…
सावंतवाडी
येथील नगरपालिकेसाठी आज नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक १,२,४ व १० हा नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच प्रभाग क्रमांक ५ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. ही सोडत प्रक्रिया आज येथील पालिकेच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर आणि मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली.