स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल सावंतवाडीचे विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी
सावंतवाडी
“विजेते जास्त काळ स्पर्धेत टिकून राहण्यास अधिक परिश्रम करण्यास आणि इतर कोणापेक्षाही अधिक चांगला निकाल देण्यास तयार असतात” – विन्स लोंबार्डी
SOF द्वारे आयोजित ऑलिंपेड परीक्षा ही विद्यार्थ्यांची विविध कौशल्ये तपासण्याकरिता आयोजित केलेली आहे. शालेय स्तरावर निसर्गातील प्रतिभा ओळखण्यासाठी ऑलिंपेड स्पर्धा आयोजित करणे हे SOF चे सामान्य उद्दिष्ट आहे.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल, सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांनीअतिशय गौरवशाली, उज्वल यश प्राप्त केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी 2021- 22 च्या सत्रातील SOF ऑलिंपेड स्पर्धामध्ये क्षेत्रीय क्रमांक, शालेय स्तरावर प्रथम क्रमांक आणि सुवर्णपदके मिळवून गौरव प्राप्त केला आहे.
शाळेचे SOF ऑलिंपेड क्रमांकधारक विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे:-
SOF आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिंपेड – अस्मि धीरज सावंत – इयत्ता तिसरी – क्षेत्रीय क्रमांक सातवा – शालेय स्तरावर प्रथम क्रमांक – सुवर्ण पदकाने सन्मानित
SOF राष्ट्रीय विज्ञान ऑलिंपेड – मनवा प्रसाद साळगावकर – इयत्ता दुसरी, शालेय स्तरावर प्रथम क्रमांक, सुवर्ण पदकाने सन्मानित
SOF आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपेड – धन्यवाद कुणाल शृंगारे, इयत्ता पहिली – शालेय स्तरावर प्रथम क्रमांक – सुवर्ण पदकाने सन्मानित.
गौरीश दीपक परब – इयत्ता दुसरी – शालेय स्तरावर प्रथम क्रमांक – सुवर्ण पदकाने विजयी.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल शाळेचे संचालक रुजूल पाटणकर, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी विजेत्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.