मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची टीका
कणकवली
खास.विनायक राऊत यांनी नेहमीच गटातटाचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली. माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांच्या गटामुळे सेनेचेच नुकसान झाले आहे. आम्ही शिवसेनेसोबत म्हणणारे कितीजण सेनेत राहतील आणि कोण उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटात सामील होतील हे लवकरच समजेल. जे निष्ठावान सेनेत राहतील त्यांनाही गटातटाचे राजकारण करून खासदार राऊत सेनेबाहेर घालवतील अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केली.
माजी आम. परशुराम उपरकर म्हणाले,शिवसेना खासदार विनायक राऊत आपल्या शिवसेना सचिव पदाचा गैरवापर करून निवडणुकीत आपली पोळी भाजून घेतात. पक्षातील पदाचा दबाव टाकून मुंबईतील पदाधिकाऱ्यांकडुन हवी ती कामे करून घेतात . मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव विनायक राऊत आणतात. राणेंच्या बंडानंतर मात्र प्रत्यक्षात खारेपाटण सीमेवर आल्यावर आपल्या गाडीवरील भगवा झेंडा गाडीत गुंडाळून राऊत शेपूट गुंडाळून जिल्ह्यात येत होते अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
राणेंच्या बंडानंतर झालेल्या हल्ल्यावेळीही राऊत स्वतःच्या घरात बसून होते. जखमी कोरगावकरना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला आम्ही पुढे होतो. हल्ला करणारे संजय पडते आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर विनायक राऊत यांना कसलीच झळ बसली नाही.
आम्ही शिवसेना सोडताना विनायक राऊत यांच्यावरच टीका करून बाहेर पडलो होतो. असेही ते म्हणाले.