You are currently viewing आठवात चिंब चिंब

आठवात चिंब चिंब

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अर्चना मायदेव लिखित अप्रतिम काव्यरचना

पाऊस आठवांचा छळतो मला कितीदा
वाटे मनातला हा कळतो मला कितीदा

पाहून वाट त्याची मी एकटीच उरते
त्याची छबी अशी मन सागरात फिरते
भासे असे मना की टाळतो मला कितीदा
वाटे मनातला हा कळतो मला कितीदा. १

हातात हात होता प्रत्यक्ष की भास होता
जाणीव होत होती तो जवळपास होता
मी आसपास आहे सांगतो मला कितीदा
वाटे मनातला हा कळतो मला कितीदा २

मी चिंब चिंब होते त्याच्याच आठवात
पाऊस आठवांचा भिजवतो अंतरंगात
घेऊन जवळ ऐसी दूर सारतो मला कितीदा
वाटे मनातला हा कळतो मला कितीदा ३

पाऊस आठवांचा छळतो मला कितीदा
वाटे मनातला हा कळतो मला कितीदा

सौ अर्चना मायदेव
ऑस्ट्रेलिया
२२/७/२२

प्रतिक्रिया व्यक्त करा