गेल्या काही दिवसातील तिसरा राडा
सोशल क्लबच्या नावावर अवैद्य धंद्यांचे गार्डन म्हणून ओळख असणारे जुगाराचे अड्डे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. या सोशल क्लब च्या बुरख्याच्या आड रमी, तीन पत्ती असे पैसे लावून जुगाराचे खेळ खेळले जातात. असेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही शाखा असलेले बाबांच्या नावाचे जुगाराचे अड्डे प्रसिद्ध आहेत.
कणकवली येथील अशाच एका सोशल क्लब वर काल दुपारी १२.३० वाजता जोरदार राडा झाला. रमी जुगार सुरू असताना शाब्दिक बाचाबाची होऊन बाचाबाचीचे रूपांतर एकमेकांना मारण्यापर्यंत झाले आणि बस चालक म्हणून ओळख असलेल्या गोराजकरला मारहाण करण्यात आली. त्यामुळे मारहाणीच्या घटनेनंतर हा सोशल क्लब कम जुगार अड्डा बंद करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी तळेरे येथील अड्ड्याची माहिती दिल्याच्या संशयावरून याच बसचालक असलेल्या गोराजकरला मारहाण झाली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा कणकवलीतील बाबांच्या नावाने सुरू असलेल्या सोशल क्लब वर रविवारी २४ रोजी राडा झाला. जिल्ह्यात सोशल क्लब मध्ये होणाऱ्या राड्यातून भविष्यात जीवितास हानी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी दखल घेणे आवश्यक आहे.