You are currently viewing कै सुधीर कलिंगण वाहणार अनोखी श्रद्धांजली

कै सुधीर कलिंगण वाहणार अनोखी श्रद्धांजली

गाजलेल्या पाच भूमिका साकारून सादर करणार “पंचतारांकित अजिंक्य तारा”;स्नेहबंध ग्रुप दोडामार्गचे २४ रोजी सरंगवे आयोजन

दोडामार्ग

कुडाळ- नेरूर गावचे सुपुत्र , नटवर्य , नटसम्राट , लोकराजा , अजिंक्यतारा कै . सुधीर कलिंगण यांच्या अजरामर ठरलेल्या पाच भूमिका साकारून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे . ‘ पंचतारांकित अजिंक्य तारा ‘ अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन स्नेहबंध ग्रुप दोडामार्ग यांच्यावतीने आज रविवार २४ जुलै रोजी सरगवे येथील खंडोबा हॉलमध्ये सायंकाळी ५.३० वा . करण्यात आले आहे

. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रुपचे संयोजक प्रेमानंद देसाई , अॅड . सोनू गवस यांनी केले आहे .

लोकराजा कै . सुधीर कलिंगण यांनी अनेक भूमिका साकारत रसिक मनात अढळ स्थान प्राप्त केले होते . त्यांनी साकारलेल्या भूमिकेतून वाहण्यासाठी स्नेहबंध ग्रुपने एका त्यांना श्रद्धांजलीआगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे दोडामार्गमध्ये आयोजन केले आहे . कै . सुधीर कलिंगण यांच्या अनेक भूमिका रसिक मनात अजूनही घर करून आहेत . यातील विशेष असलेल्या पाच भूमिकांचे सादरीकरण करून त्यांच्या अभिनयाला श्रद्धांजली वाहण्यासाठी स्नेहबंध ग्रुपने पुढाकार घेतला आहे . महाविष्णू , साईबाबा महारथी कर्ण , वेडा चंदन आणि शेवटी यादगार ठरलेली अजिंक्यतारा या भूमिकेचे कलाकारांना घेऊन अर्ध्या तासांचे नाट्यपुष्प सादर होणार आहे . वृंदा जलघर या नाट्यपुष्पात जलधर दादा राणे – कोनसकर , वृंदा ओमप्रकाश चव्हाण , विष्णू गौरव शिर्के तर वेडा चंदनमध्ये चंदन – दत्तप्रसाद शेणई , कमल निळकंठ सावंत , महारथी कर्णमध्ये कर्ण- उदय राणे कोनसकर , कुंती ओमप्रकाश चव्हाण , कृष्ण उल्हास नाईक , शिर्डी माझे पंढरपूरमध्ये साईबाबा बाबा मयेकर , दास गणू संतोष रेडकर , मयना बंटी कांबळे , अजिंक्यतारा मध्ये अजिंक्य सिद्धेश कलिंगण , रक्तवर्ण- दादा राणे कोनसकर तेजस्विनी निळकंठ सावंत , शंकर काका कलिंगण या कलाकारांचा समावेश असणार आहे . संगीत साथसाठी हार्मोनियम संदीप कोनसकर , मृदंगमणी चंद्रकांत खोत , झांज राजू कलिंगण यांची लाभणार आहे . या सर्व नाट्य पुष्पात अर्ध्या अर्ध्या तासात सर्व कलाकार सादरीकरण करतील .

लोकराजा कै . सुधीर कलिंगण यांच्या अजरामर ठरलेल्या यादगार भूमिका रंगमंचावर एकत्र पाहावयास – मिळणार असून सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे . कलिंगण घराणे राहणार उपस्थित दोडामार्ग तालुक्यात सरगवे येथे खंडोबा मंदिरात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात कै . सुधीर कलिंगण यांच्या भूमिकांचे सादरीकरण होणार आहे . यावेळी संपूर्ण कलिंगण कुटुंब या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे अॅड . सोनू गवस यांनी सांगितले .’ अजिंक्यतारा ‘ साकारणार सिद्धेश कलिंगण…

कै . सुधीर कलिंगण यांनी दादा राणे कोनसकर यांना ट्रिकसीनचे नाट्य लेखन करताना त्या नाटकाचे नाव अजिंक्यतारा ठेव असे सांगितले होते . त्यानुसार हे ट्रिकसीन नाटक काढण्यात आले . यात त्यांनी दोन ते तीनवेळा अजिंक्यताराची भूमिका सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती . त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले . नियोजित पंचतारांकित अजिंक्यतारामध्ये त्यांचे सुपुत्र सिद्धेश कलिंगण ही भूमिका कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात सादर करणार आहेत .

प्रतिक्रिया व्यक्त करा