*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार यांची अप्रतिम गझल रचना*
*कळीने फुलावे* *गझल*
वृत्त… भुजंग प्रयात मात्रा…२०
*कळीने फुलावे फुलाने हसावे
सुगंधी मनाने इथे दरवळावे!!
नभाने पुसावी मलाही खुशाली
धरेने खुशीने जरा गीत गावे!!
मनाने तुझा तूच आनंद घ्यावा
जगाला खुशी देउनी खुष करावे!!
दुरावा नको आपल्यातच कधीही
मला तू जपावे तुला मी जपावे!!
कशाला हवा तो उगा राग “अरुणा”
तुझे ते बहाणे मला ही कळावे!!
……………🍃🌷🍃……….
अरूणा दुद्दलवार
दिग्रस.. जिल्हा… यवतमाळ