You are currently viewing मसुरेतील जिल्हा परिषद शाळा नं.1 च्या मुलांनी घेतला मूर्तीशाळेतला क्षेत्रभेटीचा अनुभव

मसुरेतील जिल्हा परिषद शाळा नं.1 च्या मुलांनी घेतला मूर्तीशाळेतला क्षेत्रभेटीचा अनुभव

मालवण (मसुरे) :

 

क्षेत्रभेट हा एक शालेय जीवनातील कार्यक्रम आहे. यालाच शालेय सहल किंवा शैक्षणिक सहल देखील म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे एखाद्या क्षेत्राला भेट देणे होय. उदाहरणार्थ आपण सहलीला विविध ठिकाणी प्रवास करणे आणि नवनवीन ठिकाणांना भेट देणे हा आपल्या जीवनातीलच एक भाग आहे. कोणत्याही प्रवासातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे क्षेत्रभेट.

क्षेत्रभेट म्हणजे एका व्यक्तीने अथवा व्यक्तींच्या समूहाने, ठराविक क्षेत्राला भेट देऊन, त्या क्षेत्राचा आढावा घेणे होय. शैक्षणिक क्षेत्रात क्षेत्रभेट म्हणजे वर्गाबाहेरील कोणत्याही ठराविक क्षेत्राला भेट देणे होय.

क्षेत्रभेट म्हणजे शाळेद्वारे आयोजित करण्यात आलेली सहल. ज्यात शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घेऊन क्षेत्रभेट केली जाते. ज्याचा एकच मुख्य उद्देश असतो. तो म्हणजे भारतीय संस्कृतीचा परिचय, संस्कृतीचे महत्व, निसर्गाचा शोध, नवनवीन जीवनशैली आणि भाषेचे आकर्षण, विद्यार्थाना पटवून देणे.

अशा या उपक्रमाचा प्रत्यक्ष, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी श्री अजित म्हाडगुत यांच्या, गणेश मूर्ती शाळेत मुलांनी विविध प्रश्न विचारून, मूर्तिकला आणि मूर्तिकार यांच्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आपल्या जीवनातील अनुभव सांगताना “पूर्वीची मूर्तीकला, आताची मूर्तीकला , मूर्तीकरांच्या व्यथा, नवनवीन होत चाललेले बदल प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील उठवलेली बंदी त्यामुळे खरा मूर्तिकार कलाकार कलेपासून दूर जात आहे.पर्यावरण पूरक मूर्तीची पूजा व्हायला हवी. ग्रामीण आणि शहरी भागातील खऱ्या मूर्तीकरांची मूर्ती कला टिकवून राहिली पाहिजे,” असे विचार श्री. अजित म्हाडगुत यांनी व्यक्त केले.

केंद्रशाळा मसुरे नं. 1 च्या इ. सहावीच्या विद्यार्थ्यांनी भूगोल पाठ्यपुस्तकातील *क्षेत्रभेट* या पाठाचा प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी घेतला आगळावेगळा अनुभव. यात यशश्री ताम्हणकर, सानवी हिंदळेकर, कोमल सावंत, जान्हवी सावंत, मानसी पेडणेकर, आर्यन परब, आर्यन चव्हाण ओमकार गावडे, चैतन्य गावकर, यश बागवे, विषयशिक्षक विनोद सातार्डेकर आदीजण सहभागी झाले होते. तर या उपक्रमात मुख्याध्यापक सौ शर्वरी सावंत, विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, गोपाळ गावडे, रामेश्वरी मगर यांनी सहकार्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा