सावंतवाडी :
आरोंदा बाजारपेठे मधला जो कचरा गोळा केला जातो. तो कचरा आरोंदा स्मशानभूमीच्या मागे टाकला जातो. हा कचरा उघड्यावर टाकल्यामूळे शेजारी राहणाऱ्या लोक वस्तीत ही दुर्गंधी पसरत आहे. कचरा उघड्यावर टाकल्यामुळे भटके कुत्री हा कचरा लोकवस्तीमध्ये ओढत घेऊन येतात. त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच जवळच माळरान असल्यामुळे शेतकरी आपली गूरे चरण्यासाठी माळरानावर सोडतात. त्यातील काही गुरे तो उघड्या वरचा कचराही खातात. कचरा खाल्यामुळे गुरांना कोणतीही रोगराई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ह्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी आरोंदा येधील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात होत आहे.