राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांनी रक्तदान करून कार्यक्रमास केली सुरुवात
कणकवली
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली जिल्हा परिषद मतदार संघामध्ये युवक अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन कळसुली उपकेंद्र येथे करण्यात आले.
यावेळी युवक अध्यक्ष तथा नियोजन सदस्य प्रफुल्ल सुद्रिक यांनी स्वतः सहभाग घेऊन रक्तदान केले आणि कार्यक्रमास सुरुवात केली. ग्रामीण भागामध्ये तरुण वर्गाने अशा रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन प्रोत्साहित झाले पाहिजे जेणेकरून जिल्ह्यामध्ये रक्ताची कमतरता भासणार नाही. अजितदादा पवाराच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी स्वतः रक्तदान करीत आहे. जेणेकरून युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतील व रक्ताची कमतरता भासणार नाही.
यावेळी कळसुली ग्रामपंचायत सदस्य किशोर घाडीगावकर, सदस्य चंद्रशेखर चव्हाण यांनी रक्तदान केले. भोगनाथ सोसायटी चेअरमन रामा नाईक, उपाध्यक्ष श्री. घाडीगावकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष ॲड. भरत घाडीगावकर, युवक सरचिटणीस रुजाय फर्नांडिस, बाबाजी मूरकर, तातोबा गावकर, तावडे, सत्यविजय परब, सत्यवान परब, राष्ट्रवादी पदाधिकारी विकास दळवी, मांजरेकर, सागर शिर्के दीपक भोगले, बाळा नाईक, दिनकर परब, डॉ. जास्मिन शेख, समुदाय आरोग्य सुजाता आरको, आरोग्य सेवक रामेश्वर चिवडे, मदतनीस विद्या दळवी, स्नेहा चव्हाण, लक्ष्मण घाडीगावकर, कृष्णा घाडीगावकर, महेश देसाई, संतोष दळवी संजय घाडीगावकर, वांगणकर अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.