You are currently viewing प्राक्तन

प्राक्तन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*प्राक्तन..*

प्राक्तन प्राक्तन करू नका…
मागे त्याच्या लागू नका…
पुण्यसंचय करा जन हो पुंजी आहे मोलाची
सार्थक मानव जन्माचे नि सेवा होईल जनतेची ….

सदाचार नि सद् भावाने भरून टाका जीवन
जो जो आला जन्माला हो होईल मग त्याचं सोनं
गरीबांवरती दया करा
नित्यच देवालाही स्मरा
किमया त्याची अगाध आहे संपत्ती ही हो त्याची..

इथे न आपुले हो काही
जो तो सोडूनच जाई
लोभाचे मांजर मारूनी गरजूंना हो जवळ करा
सडण्यापरी त्या संपत्तीला समोर आपल्या दान करा

माहित आपणाला सारे
उघडा मनाची ती दारे
बघत असतो वरून बेरकी हिशोब त्याचा चोख असे
लाठी बसता पाठीवरती हातच चोळत कुणी बसे ..

प्राक्तन आहे त्याच्या जागी
होऊ नका हो पण भोगी
समन्वय साधून जन हो “तुला”करावी समतोल
गेल्यावरती लावू नये हो कुणी आपल्याला बोल ….

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २० जुलै २०२२
वेळ : सकाळी ९ : ५९

प्रतिक्रिया व्यक्त करा