You are currently viewing महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत नशमुक्ती बाबत करण्यात आली जनजागृती..

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्लेत नशमुक्ती बाबत करण्यात आली जनजागृती..

वेंगुर्ले

भारतात मुख कर्करोगाचे व त्यामुळे होणाऱ्या मुत्युचे प्रमाण सर्वात जास्त असुन तंबाखू , गुटखा, बिडी,सिगारेट चा वापर हे अत्यंत हानिकारक आहे. अश्या व्यसना मुळे होणाऱ्या कर्करोगा मध्ये सुरुवातीला तोंडात जळजळ, तोंडात पांढरा, किंवा लाल चट्टा येणे,तोंड उघडण्यास त्रास होणे ,तोंडातील आतील बाजूला लहान गाठी येणे, जेवताना तिखट असह्य होणे हि लक्षणे दिसतात. पुढे हा कर्करोग गाल,जीभ,टाळु,हिरड्यां मध्ये पसरून माने भोवती गाठी येतात व गिळताना त्रास होऊन रोगी दगावतात अशे प्रतिपादन जनसेवा प्रतिष्ठान,नशाबंदी मंडळ महाराष्ट्र शाखा वेंगुर्ले अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
महाराष्टाचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा प्रतिष्ठान, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले शहरात नशाबंदी पत्रिका वाटप कार्यक्रमात केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ.संजीव लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठान सचिव डॉ.सई लिंगवत, तालुकाध्यक्ष व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र सचिव सत्यवान साटेलकर , साहित्यिक अजित राऊळ, सुहास मांजरेकर, प्रशांत बोवलेकर, संतोष शिंगे, उमेश बोवलेकर, उमेश पेडणेकर, सुवर्णा कदम, शेजल गावडे, गोपाळ जाधव, सुनिता धुरी,दिव्या शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वेंगुर्ले नगरपालिकेच्या क्षेत्रात नशाबंदी पत्रिका वाटण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा