*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी प्रवीण खोलंबे यांची अप्रतिम काव्यरचना*
*मेघ नभात दाटले*
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या होऊनी फुटले !!धृ!!
घाट पाषाणास फुटे पान्हा,
वाहती त्यातुनी जलधारा,
मिळे ओलावा तो मायेचा,
मऊ धुक्यात हर्ष गारवा ||१||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या होऊनी फुटले!!धृ!!
होई पाषाणं मऊ गालीचे,
सुंदर मखमलीचे हिरवाईचे,
हरित तृणाचे वेल पानांचे,
जल शिंपण धवल फुलांचे ||२||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या होऊनी फुटले!!धृ!!
भरजरी हिरवा शेला नवा,
आज पांघरला धरतीवरी,
जणू दिसे वधू परी आज,
गंध प्रमेचा लावी भाळावरी ||३||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या होऊनी फुटले !!धृ!!
मेघ सावळा माझा धनी,
येतो नाचत रानी,वनी,
हर्ष भरीत तो मनामधी,
नवचैतन्य येई आज मनी ||४||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या होऊनी फुटले !! धृ!!
थेंब थेंब पाणी मातीत जिरव
अंकुर सोनियाचा येई बाहेर,
येई हिरवी त्यास पालवी,
शिवरात शोभे तुरा दानेदार ||५||
मेघ नभात दाटले हो दाटले,
घागरी दुधाच्या होऊनी फुटले !!धृ!!
युवाकवी प्रविण खोलंबे.
मुरबाड,जि.ठाणे.
मो. ८३२९१६४९६१.