You are currently viewing नाम.विनोदजी तावडे यांचा वाढदिवस वैभववाडी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा

नाम.विनोदजी तावडे यांचा वाढदिवस वैभववाडी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी साजरा

वैभववाडी

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री नाम. विनोदजी तावडे साहेब यांचा ५९ वा वाढदिवस आज दिनांक २० जुलै,२०२२ रोजी विविध उपक्रम व कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयातील विविध विभागांनी विविध स्पर्धा घेऊन साजरा केला. त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाचन स्पर्धा, ऑनलाईन क्वीज, पोस्टर प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, सेल्फ मोटिवेशन वेबिनार, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा, स्वच्छता अभियान व वृक्षारोपण व मुलींसाठी सात दिवशीय रोजगार कौशल्य प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम/ उपक्रम राबविण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मा.विनोदजी तावडे साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी संगीतमय गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने मार्च २०२२ मध्ये दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेले तीन विद्यार्थी, इयत्ता बारावीच्या परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून प्रथम आलेले तीन विद्यार्थी व आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये २०२१/२२ मध्ये तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. या वाढदिवसानिमित्त ज्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला. या वाढदिवस सोहळासाठी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जन काका रावराणे, जि. प. सदस्य व माजी विद्यार्थी श्री. सुधीर नकाशे, माजी सभापती स्नेहलता चोरगे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा नानिवडेकर, सुहास सावंत, पत्रकार उज्वल नारकर, सामाजिक कार्यकर्ते उत्तम सुतार, महेश गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस.काकडे महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये स्थानिक समिती अध्यक्ष मा. सज्जन काका रावराणे, मा. सुधीर नकाशे, मा. स्नेहलता चोरगे,मा. सीमा नानिवडेकर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मा. तावडे साहेबांनी स्वतःमध्ये विद्यार्थी दशेपासून ते राजकारणामध्ये आपली केलेली प्रगती, त्यांचा संपूर्ण संघर्षमय प्रवास तसेच त्यांनी भूषवलेली महत्त्वाची पदे यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सी.एस. काकडे यांनी कार्यक्रमानिमित्त सन्माननीय विनोद तावडे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये असलेले त्यांचे महत्त्वाचे योगदान, त्यांची महाविद्यालयासाठी असलेली प्रेरणा विशद केली. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजीवनी पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश कारेकर यांनी केले. शेवटी आभार प्रा. डी. एस. बेटकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा