कणकवली :
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ कणकवलीतर्फे मंगळवार २६ जुलैला शिवाजीनगर येथे सुहास वरूणकर यांच्या निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दुपारी १२ वा. सुशावे भजने सायंकाळी ५:३० वा.मुलांचे फनी गेम्स, रात्री ७ वा. अंताक्षरी स्पर्धा ,रात्री ८.३० वा. गुणगौरव, रात्री ९ वा.समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे. शिंपी समाज बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन शिंपी समाज एक्यवर्धक संघाचे अध्यक्ष सुहास वरूणकर व उपाध्यक्ष अजित काकडे यांनी केले आहे.