You are currently viewing राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी

राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्ट रोजी

सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार शनिवार, दि. १३ ऑगस्ट २०२२  रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. पक्षकारांनी राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून प्रकरणे तडजोडीने मिटविण्याबाबतचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस.व्ही.हांडे व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.बी.म्‍हालटकर यांनी केले आहे.

           या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यालयांमध्ये प्रलंबित असलेली तडजोडपत्र फौजदारी, दिवाणी,कौटुंबिक वाद, मोटार अपघात भरपाई, भूसंपादन प्रकरणे,  वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये तडजोडीसाठी  ठेवावी. लोकअदालतमध्ये दोन्ही बाजु ऐकून घेवून योग्य समन्वय साधुन उभयतांमध्ये तडजोड बाबत न्यायाचे तत्वास अधीन राहून सामंजस्य घडवले जाते. त्यामुळे वाद कायमस्वरुपी मिटू शकतो व  जीवन सुखमय होवू शकते. लोकांनी शांततेने व सलोख्याने राहावे हेच आमचे ध्येय आहे.

            या लोक अदालत मध्ये तडजोडीमुळे प्रकरणाचा झटपट निकाल लागतो. या निवाड्याविरुध्द अपील होत नाही. निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत होते व कोर्ट फी परतावा रक्कम प्रकरण दाखल करणाऱ्या मिळते. अधिक माहिती आवश्यक असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकारण सिंधुदुर्गचा भ्रमणध्वनी क्र. 8591903607, 02362 228414 या क्रमांकावर संपर्क साधावा . तरी सर्व नागरीकांना दि.  13 ऑगस्ट 2022 रोजीच्या राष्ट्रीय लोक अदालमध्ये आपले प्रकरणामध्ये समेट करुन आपापसात सलोखा वाढवावा, असे आवाहन श्री. म्हालटकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा