You are currently viewing अबब !!! येस बँक २०० कोटीचा घोटाळा…

अबब !!! येस बँक २०० कोटीचा घोटाळा…

 

मुंबई प्रतिनिधी/स्नेहा नाईक:

 

येस बँकेला २०० कोटींचा चुना लावल्याप्रकरणी सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. प्रमोटर्स सारंग आणि राकेश वाधवान यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने मुंबईतल्या वाधवान यांच्या दहा ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं. यामध्ये दोन ऑफिसेसचाही समावेश आहे.येस बँकेने मॅक स्टारला लोन दिलं होतं मॅक स्टार ही अल्प समभागधारक कंपनी आहे. दरम्यान या प्रकरणी सारंग वाधवान यांनी हे आरोप फेटाळल्याचे समजते आहे.

 

बँक घोटाळ्याचा आरोप असलेले वाधवान बंधू कुटुंबासोबत लॉकडाउनच्या काळातही महाबळेश्वरला गेले होते. ज्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल झाला होता. वाधवान कुटुंबापैकी काही जणांना करोनाची लागण झाली असू शकते म्हणून कुटुंबाचे विलीगीकरण करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. त्यांना लॉकडाउनच्या काळात प्रवासाची संमती कशी मिळाली हा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान आता येस बँकेच्या २०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सारंग आणि राकेश वाधवानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. यामुळे सारंग आणि राकेश वाधवान यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा