फोंडाघाट हवेली नगर रस्ता पूर्ववत न झाल्यास 1 ऑगस्टला आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अजित नाडकर्णी
फोंडाघाट (कणकवली)
देवगड निपाणी रस्ता राज्यमार्ग फोंडाघाट हवेली नगर लोरे फाटा ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था फोंडाघाट रस्त्याची चाळण झालेली आहे.अजित नाडकर्णी यांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या आंदोलनानंतर सार्वजनीक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार आता उघड झाला आहे. भर पावसात चि-याची कच टाकुन आणखीनच रस्त्याची वाट लावली आहे. हवेलीनगर रस्त्याच्या एका बाजुला गटाराची काढलेली माती रस्त्यावर येत असल्याने रस्त्याची आणखीनच वाट लागली आहे. यामुळे लोकातुन तिव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांची व्यवस्थित भर टाकून पूर्ववत न केल्यास १ आॅगस्टची डेड लाईन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे. जर रस्ते पूर्ववत न झाल्यास त्यानंतर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करुन हवेलीवासीय सा. बा. विभागाला दणका देणार असल्याचा इशारा सार्वजनिक सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी वाली नसल्याचे मत अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले आहे.