बैठकीत संघटनात्मक बांधणी आघाडीचे काम कसे करायचे या संदर्भात चर्चा करत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी रवींद्र विश्वास चव्हाण, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा संघटक पदी वसंत लक्ष्मण चव्हाण यांची निवड जाहीर करण्यात आली
*कासार्डे-*
दिनांक 17 जुलै 2022 रोजी कासार्डे येथे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीची बैठक संपन्न झाली. ही बैठक भारतीय जनता पार्टी भटके मुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे व सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी जिल्हा परिषद शक्ति केंद्रप्रमुख गणेश पाताडे, तळेरे गावचे बूथ अध्यक्ष रोहित महाडिक, वसंत चव्हाण दादाराव चव्हाण लक्ष्मण गोसावी अमित गोसावी विश्वास चव्हाण मयूर चव्हाण रवींद्र चव्हाण राजू शिंदे सुरेश पवार शिवाजी गोसावी गुलाब गोसावी बाबासाहेब गोसावी व इतर भटके विमुक्त आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हाभर जिल्हाध्यक्ष नवलराज काळे तालुका निहाय भेटीघाटी घेऊन संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याकरिता आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत याच पार्श्वभूमी वरती नुकतीच सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्षपदी नियुक्त झालेले किरण चव्हाण यांच्या सहकार्यातून कासार्डे येथील माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संपर्क कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीत नवलराज काळे व किरण चव्हाण यांनी मार्गदर्शन करून समाजाला उन्नतीकडे नेण्यासाठी या पदांचा वापर करून समाजाला न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळात आपण सर्व एकत्र येऊन करू असे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांनी मी एकट्याने शंभर जणांच्या पुढे शंभर पावलं जाण्यापेक्षा 100 जणांना घेऊन एक पाऊल पुढे जाने कधीही चांगले. त्यामुळे आम्ही किती पुढे गेलो तरी समाजाला घेऊनच आमच्या सोबत थोडे जाऊ आपण सर्वांनी बरोबर आणि काम करूया. त्याचबरोबर किरण चव्हाण यांनी देखील माझ्या पदाचा वापर माझ्या समाजाला उन्नती नेण्या करिता जेवढे काही करता येईल तेवढं करू असे आश्वासन दिले. उपस्थित समाज बांधवांनी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांचे कासार्डे नगरीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नुकतेच नवनियुक्त झालेले सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण रघुनाथ चव्हाण यांचा सर्व समाज बांधवांनी जाहीर सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कासार्डे ग्रामपंचायतचे सदस्य पाताडे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा बैठकीत दिला यापुढेही यांची कामे आमच्याच माध्यमातून होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपस्थित समाज बांधवांनी देखील केलेल्या कामांचा आढावा देत पातडे यांचे आभार मानले. सदर बैठकी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनात्मक निवडी देखील जाहीर करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी रवींद्र विश्वास चव्हाण, सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा संघटक पदी वसंत लक्ष्मण चव्हाण यांची निवड करण्यात आली. या दोघांनाही या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.