You are currently viewing विद्यामंदिर परुळे मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

विद्यामंदिर परुळे मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ले तालुक्यातील विद्या प्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलित अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे या प्रशालेत इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगवे गावचे माजी सरपंच श्री महेश सामंत उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी परीक्षेतील सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाळेकडून व भोगवे गावचे सरपंच रुपेश मुंडये यांचेकडून बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. याबरोबरच स्वर्गीय गजानन दत्ताराम तेली स्मृती पारितोषिक व स्वर्गीय श्रीकृष्ण दत्तात्रय प्रभू या पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री महेश सामंत यांनी प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व संस्थेतील सर्व कर्मचारी, विद्यार्थी वर्गाचे कौतुक केले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सचिन माने यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन श्री प्रभू पंचलिंग सर यांनी तर आभार श्री अमेय देसाई सर यांनी मानले.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मोहनराव देसाई, उपाध्यक्ष डॉक्टर उमाकांत सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश देसाई, भोगवे गावचे सरपंच रुपेश मुंडये, चेतन सामंत, अरुणा सामंत व पालक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा