You are currently viewing कणकवली बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य.!

कणकवली बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य.!

कणकवली

गेल्या दोन वर्षांपासून कणकवली बसस्थानक परिसराची अत्यंत बिकट परिस्थिती बनलेली आहे. अशातच मोठ्या खोलीचे खड्डे बसस्थाक परिसरात पडले होते. मात्र प्रशासनाकडून त्यावर दोन दिवसांपूर्वी केवळ मलमपट्टीच करण्यात आली. त्यानंतरही कणकवली बसस्थानक परिसरात चिखलाचे साम्राज्य का साम्राज्य कायमच आहे.

याचा फटका प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणत बसत आहे. बस चालक – वाहकांना विचार करून बस मार्गस्थ करावी लागते. अलीकडे शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात बस ने प्रवास करत असतो. मात्र, सुरक्षित प्रवासानंतर कणकवली बस्थानकात उतरल्यावर या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची मौल्यवान किमती वस्तूपेक्षाही जास्त प्रमाणत काळजी घ्यावी लागते.

आता तरी प्रशासन यागंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने योग्य उपाययोजना करेल काय? याकडे मात्र साऱ्या प्रवासी वर्गाचा लक्ष लागून राहिलेला आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा