मालवण
पावसाळ्यात समुद्राच्या भरतीला म्हणजेच उधाणाला जोर असतानाच आज सकाळी मालवण समुद्र किनाऱ्यावर मोठी ओहोटी पाहण्यास मिळाली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आलेल्या या ओहोटीमुळे मालवण किनाऱ्यावरील जुन्या बंदर जेटीच्या पलीकडेही पाणी ओसरले होते, त्यामुळे एरव्ही समुद्राच्या पाण्याने वेढलेली बंदर जेटी पाणी नसल्याने खालील पिलर सहित दिसून येत होती. रोजच्या सरासरी ओहोटी पेक्षा ही ओहोटी कमी असल्याची माहिती बंदर विभागाने दिली आहे. खोल समुद्रात हवामानात झालेले बदल यामुळे ही जास्तीची ओहोटी निर्माण झाली असावी असा अंदाज बंदर विभागाने वर्तविला आहे.