जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी लिखित अप्रतिम काव्यरचना
बोलताना तुझ्या जिभेवर साखर
शब्दही किती असतात मधाळ..
जरा खोल ह्रुदयात डोकावता
दिसे साचलेला द्वेषाचा गाळ..
कौतुक करताना तुझ्या असते
गालावर पडणारी सुंदर खळी..
पोटात मात्र किती जहर
भावना विषाने व्हावी निळी.
समोरच्याचा आनंद मनी आहे
तोंडावर हसून त्याला दाखवतो.
पाठ मात्र त्याची फिरता
निंदेची विखारी गरळ ओकतो.
किती क्रूरपणा मनात
चेहरा मात्र निरागस..
शब्द पडतात अपुरे
अभिनय इतका लोभस..
जगाला मानतो आपण मित्र
समोरचा मात्र वैर निभावतो..
वैर भावना मनात ठेऊन
कलंक आपल्या मैत्रीला लावतो
सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337