You are currently viewing मिर्झा एक्सप्रेस

मिर्झा एक्सप्रेस

डॉ मिर्झा रफी अहमद बेग यांच्या वाढदिवसानिमित्त जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना

*डॉ. मिर्झा रफी अहमद बेग* यांचे नाव,
*धनज माणिक वाडा* आहे त्यांचे गांव..।

मिर्झाजींचे गुरुजी होते *देविदास सोटे,*
मिर्झांजींचा एक काव्य संग्रह *घरावर गोटे..।*

कार्यक्रमात यांच्या वेळेचा लागत नाही पत्ता,
लय भारी असतो यांचा *जांगळबुत्ता*…।

*मिर्झा एक्सप्रेस* बनली आता सुपरफास्ट मिर्झा,
मिर्झाजी कहीन म्हणतात मी आहे *फक्त मिर्झा*..।

मिर्झाजींनी जीवनातील ओतला सारा सार,
तेव्हा कुठे यांचे *मिर्झायन* झाले तयार..।

मिर्झायन हे ६,००० ओळींचे *खंडकाव्य लिहिले*,
उठ आता गणपत, धुयमाती, धोतर गुतलं बोरीले..।

*सामाजिक प्रबोधनाचा* उचलला यांनी विडा,
धर्मनिरपेक्षता, शेतकऱ्यांची गेली ईडा पिडा..।

मिर्झा साहेब *महाराष्ट्राचे हास्यसम्राट*
म्हणून चाहतावर्ग आहे यांचा अफाट..।

मिर्झाजींची किती गोड *भाषा शैली,*
संपूर्ण देशात पोहोचवली *वऱ्हाडी बोली*..।

 

✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो. 9420095259*

प्रतिक्रिया व्यक्त करा