सावंतवाडी –
खंडित होत असलेला वीज पुरवठा व ग्राहकांच्या समस्या तात्काळ सोडावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिल्या नंतर शुक्रवारी वीज वितरण अधिकारी यांनी ग्रामस्थां समवेत बैठक घेवून समस्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली.
मळेवाड कोंडूरे गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता. यामुळे अनेक ठिकाणी विजे संदर्भात समस्या होत्या.या बाबत वारंवार वीज वितरण अधिकारी व वायरमन यांना समस्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी शिरोडा येथील वीज वितरणचे सहाय्यक अभियंता श्री विहीरे यांची भेट घेवून त्याना मागण्यांचे निवेदन देऊन मळेवाड कोंडुरा गावातील वीज समस्यां बाबत तात्काळ कारवाई करा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.याच पार्श्वभूमीवर सहाय्यक अभियंता श्री विहीरे यांनी गावातील समस्यांबाबत आपण बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे सांगितले.त्यानुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजता मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायत कार्यालयात सहाय्यक अभियंता विहीरे, उपसरपंच हेमंत मराठे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत ग्रामस्थांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला. त्याचबरोबर प्रत्येक वाडीवार असलेल्या समस्याची माहिती ग्रामस्थांनी वीहिरे यांना दिली.यावेळी वीहिरे यांनी गावातील असलेल्या महत्त्वाच्या समस्याची घटनास्थळी जाऊन पाहणी करुन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच घरगुती वीज मीटर बाबत वीज ग्राहकांच्या असलेल्या समस्या आपण तात्काळ सोडवू असे आश्वासित केले.यावेळी ग्रामस्थांनी आपण सांगितलेल्या समस्या 15 दिवसात न सुटल्यास आंदोलन छेडणार असे वीज वितरण अधिकाऱ्यांना सांगितले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट,मधुकर जाधव,गुरू मुळीक,भिवसेन मुळीक,विजय मुळीक,विजय चराटकर,आपा काळोजी,नारायण मडुरकर,सुधाकर मुळीक,झिला केरकर,अनिल गावडे,मिलन पार्सेकर,दिलीप शिरसाट,बाळा शिरसाट,बबन राऊत,संतोष पार्सेकर,ज्ञानेश्वर मुळीक,निलेश शिरसाट,सुमन मुळीक,जनार्दन नाईक,मनीष केरकर,नाना नाईक,महेश मेस्त्री, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.