लेखक कवी प्रा.दिलीप सुतार, कुरुंदवाड, कोल्हापूर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना
भल्या सकाळी…भर माध्यानी…
कातर … कातर …संध्याकाळी
आताशाअसं कधीही
भरून येत आभाळ…
अवकाळी…अवकाळी
अशावेळी काय करावं…?
उघडावी रस्त्याच्या बाजूची एखादी घराची खिडकी…
अन् त्यासोबत…
आपल्याच बंद मनाचे
सगळे दरवाजे सुद्धा…!!
अन् न्याहाळत रहावं
ओथंबून आलेलं आभाळ…
अन्आपल्याच घराशेजारचा
अथवा दूरस्त उभा असलेला
एखादा,संन्यस्त,मनोहर,गुलमोहर
ऊन, वादळ ,वारे झेलतानां…
पावसात चिंब भिजताना…
तरीही न हिरमुसता
तप्त धरेवर आपल्या
आरक्त पाकळ्यांची मायाळू शाल पांघरताना…!!!
ओंथबून आलेल्या आभाळालातला थेंब अन् थेंब
आपल्या निखळ मैत्रीच्या…
प्रेमाच्या,ओंजळीत…
अगदी हसत हसत साठवताना
अगदी तुझ्याच साक्षीने…
तुझ्याच समीप राहून…
तुझ्याच सारखा…
अगदी हुबेहूब तुझ्याच सारखा…
स्वत:शी सम साधलेला…
समर्पण हेच ध्येय असणारा…!!!
————————————–
प्रा दिलीप सुतार
कुरूंदवाड
मो.नं9552916501