वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्यावतीने आज दिनांक १३ जुलै रोजी गुरु पौर्णिमा कार्यक्रम प्राचार्य डॉ सी.एस.काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये पूजा साखरपेकर, प्रथमेश साळुंखे, प्रफुल्ली दळवी, मानसी पडवळ, विणा चिरपुटकर, चैताली कुबडे व प्रज्ञा कोलते या विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील,आपले शिक्षक व इतर गुरुंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. काही विद्यार्थ्यांनी कविता सादर करून आपल्या गुरूंची महती वर्णन केली. प्रा.डॉ.डी.एम. शिरसट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरु आणि शिष्यांचे नाते किती घट्ट आणि उदात्त असते याची अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
प्राचार्य डॉ. सी.एस.काकडे यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना सांगितले की, आपल्यापेक्षा वयाने लहान असलेली व्यक्ती देखील आपला गुरु असते. कारण प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तीकडून आपण नवीन गोष्टी शिकत असतो.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.निकिता चव्हाण व प्रगती मिराशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी विशाखा रावराणे व कार्यक्रमाचे आभार कुमारी सिद्धी माईणकर हिने मांडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.