You are currently viewing दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते नैवेद्य आरती

इचलकरंजी येथे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे बुधवारी श्री गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्त इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजताची नैवेद्य आरती करण्यात आली. यावेळी सेवेक-यांची मोठी गर्दी होती.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध अध्यात्मिक सेवा करण्यात आल्या. आज बुधवारी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजताची नैवेद्य आरती करण्यात आली.
गुरूंना वंदन करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार्‍या गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात सकाळी आठ वाजता उत्सवाला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकर्‍यांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्विकारण्याची विनंती केली. त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली. हजारो भाविक सेवेकर्‍यांनी गुरुपौर्णिमा उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि मानवीय समस्येवर ईश्‍वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा