सिंधुदुर्ग :
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यात राजकीय पक्षांकडून अचानकपणे मोर्चा, निदर्शने, रस्ता रोको सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी. यामुळे १३ ते २७ जुलै २०२२ या कालावधीसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्याचे संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.