दि. ३० जून ते २ जुलै या कालावधीत दुपारी १ ते ५ या वेळेत शब्दप्रेमी महिला मंचातर्फे अनोखा, आगळावेगळा व ऑनलाईन होम मिनिस्टर हा नाविन्यपूर्ण खेळ घेण्यात आला. आयोजक ,ग्राफिक्सकार , मुख्य प्रशासिका: -वैशाली पडवळ (एंजल वैशू ) सहकार्य : – सौ. प्रियांका कुटे पिकू( प्रशासिका) सौ.सुनेत्रा कुष्टे ( प्रशासिका) संकलक : सौ. गौरी शितोळे, सौ कल्पना ( ओन्ली आयडिया ) ग्राफिक्सकार : सौ श्वेता देशपांडे यांनी काम पाहिले.
शब्दप्रेमी महिला मंचाचे संचालक मंडळ म्हणजेच संस्थापिका , मुख्य प्रशासिका, ग्राफिक्सकार वैशाली पडवळ उर्फ एंजल वैशू यांची अनमोल साथ देणाऱ्या सख्या प्रशासिका सौ. प्रियांका कुटे उर्फ पिकु , तसचं प्रशासिका सुनेत्रा कुष्टे, ग्राफिक्सकार सौ. श्वेता देशपांडे यासोबतच संकलिका सौ. गौरी शितोळे आणी संकलिका कल्पना( ओन्ली आयडिया) यांनी अविरत मेहनत घेऊन हा खेळ यशस्वी केला.या खेळाच्या यशामागचं सर्वात जास्त श्रेय प्रशासिका प्रियांका कुटे( पिकु) यांना जात.
शब्दप्रेमी महिला मंचातर्फे घेण्यात आलेल्या या ऑनलाईन होम मिनिस्टर खेळात उखाणा स्पर्धा (सांगड नात्यांची), टंग ट्विस्टर ( जीभ वळवणारी वाक्य) , मजेशीर शब्द कोडी, वस्तू शोध , चित्रावरून गाणे ओळखणे , इमोजी वरून गाणे ओळखणे , प्रश्न आमचा उत्तर तुमचे आणि आगकाड्यांपासून चित्रकला असे उपखेळ घेण्यात आले…याचे विजेते पुढीलप्रमाणे…
१) उखाणा स्पर्धा : सौ. रोहिणी पराडकर, सौ. लिना नाथे हाडौळे
२) इमोजी वरून गाणं ओळखणे
सौ. प्रतिभा पोरे, स्नेहल जाधव
३) गाणे ओळखा चित्रातील: सौ. प्रतिभा पोरे
४) टंग ट्विस्टर : शुभांगी तपस्वी, मेधा भांडारकर, सुनीता शहा, किशोरी पांडे
५) आगकाड्यांची चित्रकला :सौ.स्नेहल बर्डे, मुक्ता आगळे
६)वस्तू शोध : सौ. प्रतिभा पोरे, अलका पाटील
७) प्रश्न आमचा उत्तर तुमचे विजेती : सौ. स्नेहल जाधव
८) शब्दकोडे : सौ. स्नेहल जाधव
या विजेत्यांना घेऊन अंतिम खेळ घेण्यात आला ज्यात चारोळ्यांची बुलेट ट्रेन आणि तळ्यात मळ्यात हे उपखेळ घेण्यात आले. या खेळांमध्ये ठरलेले विजेते पुढील प्रमाणे :
१) चारोळ्यांची बुलेट ट्रेन : सौ. प्रतिभा पोरे
२) तळ्यात मळ्यात : लीना नाथे ( हाडौळे )
या सर्व खेळात महाविजेत्या अर्थात होम मिनिस्टर ठरलेल्या प्रतिभाताई पोरे यांना मोरांची सुंदर नक्षी असलेली सेमी पैठणी(चिंतामणी रंगाची) देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक खेळात विजेत्या ठरलेल्या सखींना तसचं सर्व सहभागी स्पर्धकांनाही आकर्षक ऑनलाईन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रतिभाताईंच्या तसेच सर्व विजेत्या व सहभागी महिलांच्या या ऑनलाईन होम मिनिस्टर खेळाबद्दल खूपच बोलक्या, उत्साहवर्धक व प्रेरणादायक प्रतिक्रिया होत्या. यापुढेही असेच खेळ , उपक्रम, स्पर्धा घेऊन याव्यात असा लडिवाळ हट्ट महिलांनी शब्दप्रेमी-महिला मंच संचालक मंडळाकडे केला आहे..!!