You are currently viewing मावळ्यांच्या १२ पुतळ्याची संकल्पना मुख्याधिकाऱ्यांची… ! -अमित इब्रामपूरकर

मावळ्यांच्या १२ पुतळ्याची संकल्पना मुख्याधिकाऱ्यांची… ! -अमित इब्रामपूरकर

वैभव नाईकांनी शहरातील अर्धवट असलेल्या कामांचे श्रेय घ्यावे- मनसेचा सल्ला

ओबीसी आरक्षण न्यायालयात असल्याने मालवण न.प.चे मुख्याधिकारी प्रशासक आहेत.सहा महिन्यापासून ही जबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या कार्यकाळात प्रशासक म्हणुन दांडी येथे बीच महोत्सव अधिकारी ,कर्मऱ्यांना सोबत घेत यशस्वी केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ मावळ्यांची संकल्पना मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीच असुन आमदार वैभव नाईक त्याचे श्रेय घेत असल्याची टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी करत आमदारांना शहरातील अर्धवट असलेल्या वापर कामांचे श्रेय घेण्याचा सल्लाही दिला आहे.
डीपीडीसी मधुन सर्वच आमदारांना मागणी केल्यास निधी मंजुर केला जातो.पण आलेला निधी खर्च करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग मुख्याधिकाऱ्यांनी केला. नाईक गेली सात वर्षे सत्तेत होते.मालवण नगरपालिकेच्या एका तरी प्रकल्पासाठी मोठा निधी वैभव नाईक निधी आणू शकलेत का? फक्त मंत्र्यांच्या दालनात फोटोशुट करण्यात मग्न होते.मालवण शहराची तुंबई झाली त्यावेळी मातोश्रीवर ‘मी निष्ठावानचा’ जपमाळ आमदार करत होते. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे ओरोस,कुडाळचा अतिरिक्त पदभार आहे.नगरसेवक टक्केवारी घेत असल्याने तसेच बेनामी ठेकेदारी असल्याने कचऱ्याचे टेंडर दुसरी मागणी करून कोणी भरले नाही याची आम.वैभव नाईक यांना माहिती होती.शेवटी समोर पाऊस असल्याने मुख्याधिकाऱ्यांना नाशिकच्या ठेकेदाराला ठेका द्यावा लागला.स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच वैभव नाईकांकडून मुख्याधिकारी यांना रस्त्यावर त्रास देण्याचे काम केले.प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्वार्थासाठी भर रस्त्यावर आमदारांनी झापणे जिल्ह्याची संस्कृती नाही.एकीकडे महोत्सवाचे नियोजन केल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे शहरात पाणी तुंबल्याने अंगाशी येताच फैलावर घेण्याचे काम करत आहे.
भुयारी गटाराचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत.कचऱ्यापासून वीजनिर्मिती पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत तिथे आडारी डम्पिंग ग्राउंडचे दुषित पाणी रस्त्यावर येते.शहराला २४ तास वीज मिळणार अश्या बाता मारून देऊळवाड्यातील वीज उपकेंद्राचे उद्घाटन केले.आज नागरिक सतत वीज खंडित होण्याने त्रस्त आहेत. शहरातील अनेक दिवे बंद आहेत.तिलारीचे पाणी मालवण शहराबरोबरच देवबाग-तारकर्लीला नेणार अशी घोषणा केली.त्याचे पुढे काय झाले,पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून भुमिगत वीज वाहिन्यांचे पुढे काय झाले ते जनतेला सांगावे. असेही मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा