You are currently viewing बंद हायमास्ट टॉवर तातडीने सुरू न केल्यास जनआंदोलन….

बंद हायमास्ट टॉवर तातडीने सुरू न केल्यास जनआंदोलन….

मालवण :

शहरातील चिवलाबीच किनारपट्टीवरील हायमास्ट टॉवर मागील सहा महिन्यांहून अधिक काळ बंद आहे. यामुळे येथील नागरिकांची विशेषतः रापणकर मच्छिमारांची गैरसोय होत असून या हायमास्ट टॉवरची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
चिवला बिच किनारपट्टीवर रापण मच्छिमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. येथील स्थानिक मच्छीमार या व्यवसायावर अवलंबून असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून रापण व्यवसायाचे महत्त्व आहे रात्रीच्या वेळी रापण किनार्‍यावरून आणली जाते. मात्र येथील हायमास्ट टॉवर बंद असल्याने मासे सोडविणे तसेच माशांची ने-आण करणे गैरसोयीचे बनले आहे. तसेच या भागात पर्यटक की मोठ्या संख्येने भेट देत असून येथील हायमास्ट टॉवर सुरू करावा अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा