You are currently viewing पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी जलक्रीडा, पर्यटन व्यावसाईकांच्या समस्या मांत्रिमंडळ बैठकीत मांडाव्यात – बाबा मोंडकर

पालकमंत्री श्री उदय सामंत यांनी जलक्रीडा, पर्यटन व्यावसाईकांच्या समस्या मांत्रिमंडळ बैठकीत मांडाव्यात – बाबा मोंडकर

मालवण

कोरोना व्हायरस बरोबर गेले वर्षभर ओखी, क्यार, निसर्ग वादळाने संकटात असलेला जलपर्यटन व्यावसाईक जलक्रिडा साठी नियमावली (sop)जाहीर करत आहे यांची वाट बघत बसलेला असतानाच पर्यटनाची जीवदायांनी असलेल्या सिंधुदुर्ग किल्ला फेरीस नष्ट करण्यासाठी ठाकरे सरकार पुढे आले आहे. या मार्गावर चालणाऱ्या एका होडीत १२ पर्यटकांना नेण्याची मंजुरी असते. आतापर्यंत प्रति व्यक्ति १ लाख असलेला इन्शुरन्स वाढऊन प्रति व्यक्ति ५ लाख करण्यात आला त्यामुळे १२ व्यक्तीचा ६० लाख रुपयेचा इन्शुरन्स सामान्य होडीचालक करणार कसा हा यक्ष प्रश्न होडीचालकांसमोर आहे जो पर्यंतव्यावसाईक ही इन्शुरन्स रक्कम भरत नाही तो पर्यंत लायसन्स मिळणार नाही असे सांगून ठाकरे सरकारच्या बंदर विभागांने हात वर केले आहे हाच प्रकार स्कुबा डायव्हीग, बोटींग, वाँँटर स्पोर्ट च्या बाबतीत चालु असून हा सर्व विषय पर्यटनाशी जोडला असल्याने पर्यटन मंत्री श्री आदित्यजी ठाकरे यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आज या व्यावसाईकांकडे इन्शुरन्स पैसे भरण्यासाठी येणार कुठून हा विचार सरकारने करून हा इन्शुरन्स व्यवसायाईकांकडुन न स्वीकारता ज्यावेळी बंदर विभाग प्रत्येक जलक्रीडा करताना पर्यटकांकडुन कर आकारते त्याचवेळी रेल्वे,बि एस टी, एस टी प्रमाणे विभागाप्रमाणे हा इन्शुरन्स प्रतिपर्यटकांकडुन आकारावा.तसेच या क्षेत्रातील व्यावसाईकांकडुन कुठलाही कर न घेता त्यांना व्यवसायास परवानगी देण्यात यावी तसेच जिल्हयातील सर्व व्यावसाईकांना एकत्र करून त्यांना मंजूर प्रवाशी क्षमतेच्या किती टक्के प्रवाशी वाहतूक करावी या संबंधी चर्चा करून शासनाने अधिकृत परिपत्रक (sop) जाहीर करावे अन्यथा होणाऱ्या व्यावसाईकांच्या उद्रेकांस ठाकरे सरकार जबाबदार राहील. आम्ही पर्यटन व्यावसाईकांच्या सोबत असून जलपर्यटन व्यावसाईकांस अपेक्षितअसलेल्या बदलांसाठी पुढील काही दिवस जिल्हयाच्या पालकमंत्री महोदयानी काम करावे, अशी मागणी भाजपा जिल्हा प्रवक्ते व टी टी डी एस अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केली आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा