You are currently viewing भारत सरकारचा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला प्राप्त

भारत सरकारचा जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलला प्राप्त

कुडाळ :

 

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रिलया तर्फे दिला जाणाराऱ्या जिल्हास्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्काराने कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल (CBSE बोर्ड)ला नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. सिधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात आयोजित सोहळ्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण नुकतेच करण्यात आले. स्कूलच्या अॅकॅडमिक हेड चैताली बांदेकर, सहकारी शिक्षिका मधुरा इन्सुकर, अश्विनी परब, विभा वझे व पालक मनाली पाटकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शासनाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेला स्वच्छता या विभागात 95% गुणासह पाच स्टार रेटिंग प्राप्त झाले. तसेच कोविड पूर्वतयारी व उपायोजना व प्रसाधनगृहे, स्वच्छता या उपविभागातहे फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले आहे. सदर स्कूल आता राज्य स्तरीय पुरस्काराच्या नामांकनसाठी पात्र झाले आहे. बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या प्रिन्सिपल शुभांगी लोकरे-खोत, सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या निकष, गाईडलाईन- नियमानुसार केलेल्या सातत्यपूर्ण कामाचा हा सन्मान असून स्कूलच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा