You are currently viewing केंद्रात, राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे वादळ कोणीही रोखू शकत नाही

केंद्रात, राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे वादळ कोणीही रोखू शकत नाही

शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा भाजपा नेते निलेश राणेंना इशारा

मालवण

राज्यात आमची सत्ता आहे, त्यामुळे आम्हाला रोखू शकत नाही, असे वक्तव्य माजी खासदार निलेश राणे यांनी काल नगरपालिकेत केलं आहे. मात्र केंद्रात किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असो, शिवसेनेचे वादळ कोणी रोखू शकत नाही. वैभव नाईक हे आमसभेचे नव्हे तर आम जनतेचे नेते आहेत. मतदार संघातील गावागावात जनतेशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत वैभव नाईक यांच्या समोर कोणाला उभे करणार ? स्वतः निवडणूकीत उतरणार की मागील वेळेत रणजित देसाई सारख्या कार्यकर्त्याला उभे करणार, हे निलेश राणे यांनी जाहीर करावे. वैभव नाईक यांच्या विजयाच्या हॅट्ट्रिक साठी आम्ही शिवसैनिक सज्ज आहोत, तर भाजपने पराभवाच्या हॅट्ट्रिकसाठी तयार रहावे, असे प्रत्युत्तर तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

मालवण शिवसेना शाखेत हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते निलेश राणे यांच्या कालच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, मंदार केणी, मंदार ओरसकर, अमेय देसाई, प्रसाद मोरजकर, गणेश कुडाळकर, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, दशरथ कवटकर, बंड्या सरमळकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा