कणकवली
अपशकुनी संदेश पारकर यांच्या विरोधात कणकवलीकरांनी मला नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे.त्यामुळे खरे दरोडेखोर आणि लुटारू हे कोण आहेत ते कणकवलीच्या जनतेला माहित आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, तुमचा असताना मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा तुम्ही स्थलांतर करू शकला नाहीत, ते अवघ्या 3 दिवसांत आमच्या कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले. पुतळा स्थलांतर बाबत हायकोर्टात जा किंवा आणखी कुठे जा. आम्ही घाबरत नाही कारण आमची बाजू सत्याची आहे. पारकर यांची विधाने म्हणजे ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ अशी अवस्था झाली आहे असा टोला कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, किशोर राणे, अजय गांगण,राजू गवाणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
समीर नलावडे म्हणाले,संदेश पारकर यांचे शहर मर्यादित राहिलेल्या नेत्यांने समाज विघातक काल भूमिका मांडली.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नगरपंचायतमध्ये ठेवला,प्रशासनाने कायद्याप्रमाणे विधिवत पूजा करुन सुरक्षित ठिकाणी हा पुतळा ठेवला आहे.कणकवलीत मिलींद कोदे मारहाण,साळुंखे पोलीस अधिकाऱ्यांना कॉलेज मध्ये मारहाण करत गुंडगिरी कोणी केली? कणकवली शहरातील एका पिढीला बरबाद करण्याचे काम पारकरांनी केले आहे.
संदेश पारकर यांनी दरोडेखोर लुटारु, हे आरोप आमच्यावर केले.पारकर यांचा पूर्व इतिहास सर्वात जास्त मला माहीत आहे.शहरातील अनेक पतसंस्थेत दरोडे कोणी घातले? उधारी मागितली म्हणून व्यापाऱ्यांला कोणी मारहाण केली.पोलीस अधिकाऱ्यांवर हात कोणी उचलला. हे जनतेला माहीत आहे त्यामुळे गुंडगिरी व लुटारुपणा कोणी केला?त्यांनी माझ्यावर व आम.नितेश राणे यांच्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहेत,असा टोला समीर नलावडे यांनी लगावला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ,धमकी आमदारांनी दिलेली नाही.आम्ही तिथे नव्हतो,याउलट पोलिसांची बदनामी केली म्हणून संदेश पारकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत.पारकर यांनी शिवसेनेत काम करताना हिंदुत्ववादी विचारांचा अभ्यास केला पाहिजे. हिंदू धर्मात पहाटे ४ वाजताची वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणतात.त्यामुळे पहाटे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थलांतर केला,कारण ते आमचे दैवत होते,सन्मानाने तो पुतळा योग्य सुरक्षित स्थळी ठेवला.त्यामुळे जुगारडे, पटवाले कोण आहेत ?हे जनता जाणते ,त्याचे नाव मी घेऊ इच्छित नाही.कणकवली शहराचा विकास काय असतो,हे दाखवून दिले आहे त्यामुळे पारकरांच्या घराकडे गर्दी कमी झाल्याने ते सैरभैर झाले असल्याचा आरोप समीर नलावडे यांनी लगावला.
आता कणकवलीचा विकास थांबविण्यासाठी हा त्याचा खटाटोप आहे.आम्ही अजून जोरदार शहराचा विकास नियोजनबद्ध आम्ही करणार आहोत.बाळासाहेब ठाकरे व भाजापाचे राज्यात सरकार आले आहे. पारकर याना शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर नसल्याने विरोध केला आहे.हा हिंदुत्ववादाला विरोध आहे.
शिंदे गट व भाजपा सरकार आले तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या हातात हात यांनीच दिला होता आणि त्यांचे संध्याकाळी सर्व आमदार पळून गेले.दुपारी उपनेते गौरीशंकर खोत यांच्या हातात त्यानी हार दिला तो शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने काढून नेला. हा यांचा अपशकुन आहे.या .राणेंनी महामंडळ दिले त्यावर दरोडा त्यांनी घातला.संदेश पारकर स्वतः च्या यांनी स्थलांतराची काळजी करावी.
गेल्या काही दिवसांत ते पालीवारी करताहेत.त्यामुळे भविष्यात एकत्र आले तर एकदा वार्ड ॲडजस्टमेंट करुन देऊ.खुलेआम उदय सामंत यांच्या सोबत जायचे असेल तर जा.उद्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या केबिन बाहेर हेच असतील.त्यांना आ.नितेश राणे खंबीर उत्तर देण्यासाठी आहेत.माहितीच्या अधिकारात कशाला तर पारकर यांनी साधा अर्ज नगरपंचायतीकडे करावा त्याना हवी ती माहिती मुख्याधिकारी देतील,असे समीर नलावडे यांनी सांगितले.
भावाला ग्रामपंचायत मध्ये निवडून आणू न शकणाऱ्या अतुल रावराणे यांनी शहराच्या विषयात बोलू नये.नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर तुम्हाला भविष्यात चांगलं उत्तर मिळेल,असा इशारा उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला.