You are currently viewing तिलारी प्रकल्पात 86.66 टक्के पाणीसाठा

तिलारी प्रकल्पात 86.66 टक्के पाणीसाठा

तिलारी प्रकल्पात 86.66 टक्के पाणीसाठा

जिल्ह्यातील 1 मध्यम आणि 14 लघु प्रकल्प फुल

सिंधुदुर्गनगरी

 तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 41.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 374.254 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 86.66 टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण 5 हजार 132 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामध्ये डाव्या कालव्यातून 423.720 आणि सांडवामार्गे 4 हजार 708 क्लुसेक्स विसर्ग होत आहे. तसेच जिल्ह्यातील कोर्ले सातांडी हा मध्यम प्रकल्प आणि 14 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत.

                जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

        मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-58.8810, अरुणा -6.1931, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.648, नाधवडे- 2.572, ओटाव- 1.608, देंदोनवाडी – 1.004, तरंदळे -3.056, आडेली-1.288, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 1.932, हातेरी- 1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-1.150, सनमटेंब- 2.390, तळेवाडी- डिगस- 1.097, दाभाचीवाडी- 1.545, पावशी- 3.030, शिरवल -3.680, पुळास -1.508, वाफोली – 2.067, कारिवडे – 1.055, धामापूर – 1.891, हरकूळ -2.380, ओसरगाव – 1.034, ओझरम – 1.819, पोईप – 0.885, शिरगाव – 0.414, तिथवली – 1.366, लोरे- 2.696 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे- 1.584, शिरवळ- 0.602, वर्दे-0.000, कोकीसरे-0.319, नानीवडे- 0.487, सावडाव-0.298, जानवली-0.834 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा