You are currently viewing तरही गजल

तरही गजल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी जयराम मोरे यांची अप्रतिम गझल*

*तरही गजल*

रस्त्यात श्वापदांचा संचार होत आहे
*घरट्यात ये मुली तू अंंधार होत आहे*

चमकत रहा विजांनों संकेत द्या जगाला
गर्भातल्या कळ्यांवर संस्कार होत आहे

आदर्श लोकशाही होती कधी इथेही
आता विचारधारा खंगार होत आहे

रात्रीत पस्त झाला कट्टरपणा कसा हा
पैश्यां समोर निष्ठा भंगार होत आहे

आभाळ दाट आहे पण कोरड्या ढगांनी
मातीतल्या बिजांचा हूंकार होत आहे

अश्वासनास फसली इथली गरीब जनता
फसव्याच घोषणांचा ललकार होत आहे

जखमा वयात आल्या सांगून रात्र गेली
हृदयात आठवांचा श्रृंगार होत आहे

*जयराम मोरे सोनगीर*

प्रतिक्रिया व्यक्त करा