दात पडक्या आप्पा, टिंगल मेंथेरो पुन्हा चर्चेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. रमी सारखे पत्त्यांचे खेळ खेळण्यासाठी सुरू झालेले हे स्पोर्ट्स क्लब दिवसेंदिवस जुगार अड्ड्यांचे केंद्र बनत चालले आहे. देवाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या या स्पोर्ट्स क्लब मध्ये बऱ्याचदा मारामारी सारखे राडे होतात. त्यामुळे विनाकारण शहराचे नाव खराब होते.
तीन दिवसांपूर्वी कासार्डे येथे पाच, दहा रुपयांचा रमी क्लब सुरू होता. दात पडक्या आप्पा हा जुगाराचा बादशाह समजला जातो. या दात पडक्या आप्पाने आणि त्याच्या एका पार्टनरने अचानक पन्नास पॉईंटचा क्लब तिथे सुरू केला. पाच, दहा पॉईंट वरून पन्नास पॉईंटचा क्लब सुरू झाल्याची खबर बाहेर जाताच जुगाराच्या धंद्यांची संबंधित असलेला बस ड्रायव्हर प्रितेश गिरणकर यांने याबाबतची चुगली खाकी वर्दीकडे केली. प्रितेश गिरणकर हा कणकवली येथील सोशल क्लबचा राजासाईबाबा स्पोर्ट्स क्लब ज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक शाखा आहेत, त्याचप्रमाणे खाकी वर्दीचा आशीर्वाद लाभलेला, राजकीय लोकांनी तक्रार करूनही बंद न झालेल्या साईबाबा स्पोर्ट्स क्लबचा मालक टिंगल मेंटेरो याचा पार्टनर आहे. बस ड्रायव्हर गिरणकर यांने चुगली केल्यानंतर कासार्डे स्पोर्ट्स क्लबवर खाकी वर्दी वाल्यांनी धाड टाकली. कासार्डे स्पोर्ट्स क्लब वरील धाडीत खाकी वर्दीला तब्बल साडे पाच लाख रुपये रक्कम मिळाली. परंतु कासार्डे येथे पडलेल्या धाडीत खाकी वर्दीने केवळ दीड लाख रुपये रक्कम हस्तगत केल्याचे दाखविले.
कासार्डे येथील स्पोर्ट्स क्लब वर धाड पडल्यानंतर सदरची खबर साईबाबा स्पोर्ट्स क्लब चा पार्टनर प्रितेश गिरणकर यांनी दिल्याचे समजताच कणकवली येथील साईबाबा स्पोर्ट्स क्लब वर झाला राडा. या राड्यामध्ये प्रितेश गिरणकर याला मारहाण झाली. परंतु प्रितेश तिथून निसटला. यापूर्वी एकदा मालवण येथील जुगाऱ्यानी देखील कणकवलीतील साईबाबा स्पोर्ट्स क्लब मध्ये राडा केला होता. स्पोर्ट्स क्लबच्या नावावर तीन पत्ती, रमी यासारखे पैसे लावून जुगार खेळले जातात. त्यामुळे अशा अवैद्य धंद्यात नेहमीच राडे होत असतात आणि अवैद्य व्यवसायातील या राड्यांमुळेच कणकवली शहराचे नाव देखील बदनाम होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात गांभीर्याने लक्ष घालून शहराची होणारी बदनामी थांबविणे अशी मागणी कणकवली वासीयांकडून होत आहे.