You are currently viewing जिल्हा परिषदचे सीईओ प्रजित नायर उतरले शेतात

जिल्हा परिषदचे सीईओ प्रजित नायर उतरले शेतात

‘बळीराजाठी एक दिवस’ उपक्रम उत्साहात..

 

मालवण :

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी मालवण तालुक्यातील गोळवण गावातील शेतामध्ये विद्यार्थी, पालक व शेतकऱ्यांच्या साक्षीने जोत धरत, ट्रॅक्टर नांगरत, तरवा काढून, लावणी लावत सर्वांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला. समाजामध्ये शेतीची, शेतकऱ्याची प्रतिष्ठा वाढावी या उद्देशाने त्यांनी सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

उपक्रमामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, प्रा. शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, जिल्हा कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. देसाई, गटविकास अधिकारी गुजर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, सरपंच श्री. लाड व गावातील शेतकरी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या निमित्ताने गोधन पूजा करण्यात आली. अधिकारी, शेतकरी वर्गाबरोबर सर्व विद्यार्थी, शिक्षक शेतकामात दंग झाले होते. गावाच्या लोकांनी शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी दिंडीचा कार्यक्रम सादर केला तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पटनाट्याद्वारे शेतीचे महत्व सर्व लोकांना सांगितले. शाळेतील गुणवत व गुणवंत विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. खऱ्या अर्थाने बळीराजासाठी एक दिवस हा उपक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन व आभार रामचंद्र आंगणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत संतोष पाताडे व सहकाऱ्यांनी घेतली. यावेळी एक प्रगत शेतकऱ्यांने ट्रेममध्ये रोप कशी तयार करावी याचे प्रात्यक्षिक दाखवले.

प्रतिक्रिया व्यक्त करा